Sunday, March 10, 2019
Friday, March 8, 2019
सभासदांच्या व संस्थेच्या हितासाठी
1] संस्थेकडे कर्ज मागणीचा अर्ज करतेवेळी
त्या अर्जात स्वतःची व जमीनदारांची संपूर्ण नावे,जन्म दिनांक,नेमणुकीचा
दिनांक,कर्ज मागणीची रक्कम,कर्जाचा मासिक हप्ता,व त्याची संख्या,कर्जमागणीचे
कारण,महागाईसह एकूण पगार, स्वतःच्या,जमीनदारांच्या व साक्षीदारांच्या सह्या,शिल्लक
राहिलेल्या नोकरीची वर्षे वगैरे अर्जातील सर्व रकाने पूर्ण भरून ते अर्ज संस्थेच्या कार्यालयात दयावेत.
2] पूर्वी काढलेल्या कर्जाची १/२ फेड
झाल्याशिवाय कर्जाची पुन:मागणी करू नये.सभासदास दोघांपेक्षा जास्त सभासदांच्या
कर्जास जामीन होता येत नाही.
3] कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी कर्जदार व
जामीनदार यांची संयुक्तपणे व प्रत्येकाची असल्याने आपले व आपण जामीन असलेल्या
कर्जदाराचे हप्ते पगारातून नियमितपणे कपात केले जातील याकडे काळजीपूर्वक लक्ष
दयावे.
4] संस्थेकडील स्वतःचे खात्यावरील जमा
रक्कम,भागाची रक्कम व नावे कर्जाच्या रकमेची खात्री करून घेण्यासाठी संस्थेच्या
कार्यालयाशी वेळोवेळी संपर्क करावा.
5] रोखीने रक्कम भरावयाची झाल्यास लगेचच
रितसर जमा पावती घ्यावी.
6] स्त्री अगर पुरुष सभासदांचे नाव बदलल्यास
त्या संबंधीच्या बदलांच्या नोंदी करण्याकरिता गॅझेटचे प्रतीसह संस्थेच्या
कार्यालयाशी संपर्क साधावा.
7] ज्या सभासदांनी वारसाची नोंद संस्थेच्या
दप्तरी अद्यापही केली नाही त्यांनी कृपया संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधून
वारसाची नोंद करण्यासंबंधीचे अर्ज सादर करावेत.
8] आपली बदली झाली असल्यास संस्थेस आपला
नोकरीच्या गावचा बदललेला पत्ता त्वरित पाठवावा. संस्थेच्या देणे रकमाशी वसुली जात
नसल्यास लगेच कार्यालयास कळवावे.
संचालक
मंडळ
सहकार
तपस्वी ब्रह्मदेवदादा माने शिक्षक सहकारी पतसंस्था सोलापूर
Wednesday, March 6, 2019
Subscribe to:
Posts (Atom)