सहकार तपस्वी ब्रह्मदेवदादा माने शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित,सोलापूर आपले हार्दिक स्वागत करीत आहे.

सहकार तपस्वी ब्रह्मदेवदादा माने शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या.,सोलापूर पतसंस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, माहे जून 2019 अखेर आपल्या खात्याची माहिती ई-बँकिग मधील सभासद लॉगीन या Drop Down मेनू मध्ये अपलोड करण्यात आलेली आहे.

Sunday, September 26, 2021

वार्षिक अहवाल सन 2020-21

 


पतसंस्थेच्या सर्व सन्माननीय सभासदांना कळविण्यात येते कि,पतसंस्थेचा वार्षिक अहवाल आपणास डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिला असून सर्वांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा व अहवाल pdf आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा.

Pdf साईज  8.5 mb








Saturday, September 7, 2019

संस्थेची कर्जमर्यादा व व्याजदर


कर्ज मर्यादा 5 लाख 
रुपये कर्जाचा व्याजदर 10.80% 
 ठेवीवरील व्याजदर 09.60% 
 तातडीचे कर्जमर्यादा रु.20000/- 
 सभासद शेअर्स वर्गणी रु.1500/-
 लेखापरीक्षण 18-19 ऑडिट वर्ग "अ"

Sunday, March 10, 2019

प्रास्ताविक

सहकार तपस्वींनी केले काय                         मातीमध्ये रोवले पाय,                                    उभा केला माणूस असा,                                     सागरामध्ये दीपस्तंभ जसा                           ज्यांनी आयुष्यभर माणसं जोडण्याचं आणि घडवण्याचे कार्य केले ते आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान सहकार तपस्वी ब्रह्मदेवदादा माने आणि याच कार्यकर्तुत्वाचा वारसा लाभलेले आपले लाडके नेते माजी आमदार मा.दिलीपरावजी माने(मालक),राज्यातील शिक्षकांचे ह्दयसम्राट मा.संभाजीराव थोरात व निष्ठेच्या,कर्तुत्वाच्या जोरावर आणि सर्व शिक्षकांच्या पाठबळावर शिक्षक हिताचे कार्य करणारे आमचे मार्गदर्शक सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष मा.मच्छिंद्रनाथ मोरे सर यांच्याच विचारांचा वसा घेऊन सर्व संचालकांच्या सहकार्याने हा संस्थेचा रथ चालवत आहे. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे.राजकीय,सामाजिक,शैक्षणिक इतकेच नव्हे तर आर्थिक क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे.अशा स्पर्धेच्या युगात विशिष्ट ध्येयवाद बाळगून काम करणाऱ्या संस्था विरळ झाल्या आहेत.तरीही निव्वळ शिक्षकांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या या संस्थेची स्थापना आमचे मार्गदर्शक तथा शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष मा.मच्छिंद्रनाथ मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. आपल्या संस्थेच्या सभासद शिक्षक बंधू आणि भगिनींनी संस्थेच्या नियमांचे पालन करून कामकाज सुरळीत ठेवण्यामध्ये मोलाची भर घातली त्यामुळेच आपली संस्था आज प्रगतीचे शिखर गाठत आहे. आज आपणास सांगण्यास आनंद होतो की,आपल्या पतसंस्थेची ऑनलाईन शाखा सुरु करण्यात आलेली आहे.त्यामुळे सर्व सभासद आपल्या खात्याची माहिती या साईटवरुन घेऊ शकतील.आपला अमुल्य वेळ वाचवा यासाठी संचालक मंडळाचा हा छोटासा प्रयत्न. संस्थेच्या यशात असाच आपला हातभार व सहकार्य असावे . धन्यवाद.                                      चेअरमन                          श्रीमती नुरजहा राजअहमद शेख  

Friday, March 8, 2019

सभासदांच्या व संस्थेच्या हितासाठी





      फक्त सभासदांसाठी            
1] संस्थेकडे कर्ज मागणीचा अर्ज करतेवेळी त्या अर्जात स्वतःची व जमीनदारांची संपूर्ण नावे,जन्म दिनांक,नेमणुकीचा दिनांक,कर्ज मागणीची रक्कम,कर्जाचा मासिक हप्ता,व त्याची संख्या,कर्जमागणीचे कारण,महागाईसह एकूण पगार, स्वतःच्या,जमीनदारांच्या व साक्षीदारांच्या सह्या,शिल्लक राहिलेल्या नोकरीची वर्षे वगैरे अर्जातील सर्व रकाने पूर्ण  भरून ते अर्ज संस्थेच्या कार्यालयात दयावेत.

2] पूर्वी काढलेल्या कर्जाची १/२ फेड झाल्याशिवाय कर्जाची पुन:मागणी करू नये.सभासदास दोघांपेक्षा जास्त सभासदांच्या कर्जास जामीन होता येत नाही.

3] कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी कर्जदार व जामीनदार यांची संयुक्तपणे व प्रत्येकाची असल्याने आपले व आपण जामीन असलेल्या कर्जदाराचे हप्ते पगारातून नियमितपणे कपात केले जातील याकडे काळजीपूर्वक लक्ष दयावे.

4] संस्थेकडील स्वतःचे खात्यावरील जमा रक्कम,भागाची रक्कम व नावे कर्जाच्या रकमेची खात्री करून घेण्यासाठी संस्थेच्या कार्यालयाशी वेळोवेळी संपर्क करावा.

5] रोखीने रक्कम भरावयाची झाल्यास लगेचच रितसर जमा पावती घ्यावी.

6] स्त्री अगर पुरुष सभासदांचे नाव बदलल्यास त्या संबंधीच्या बदलांच्या नोंदी करण्याकरिता गॅझेटचे प्रतीसह संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

7] ज्या सभासदांनी वारसाची नोंद संस्थेच्या दप्तरी अद्यापही केली नाही त्यांनी कृपया संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधून वारसाची नोंद करण्यासंबंधीचे अर्ज सादर करावेत.

8] आपली बदली झाली असल्यास संस्थेस आपला नोकरीच्या गावचा बदललेला पत्ता त्वरित पाठवावा. संस्थेच्या देणे रकमाशी वसुली जात नसल्यास लगेच कार्यालयास कळवावे.

               संचालक मंडळ
सहकार तपस्वी ब्रह्मदेवदादा माने शिक्षक सहकारी पतसंस्था सोलापूर








Wednesday, March 6, 2019

पतसंस्थेचे उपक्रम


दरवर्षी पतसंस्थेमार्फत मानाचा समजला जाणारा "सहकार तपस्वी ब्रह्मदेवदादा माने आदर्श शिक्षक पुरस्कार" दिला जातो.

विविध परीक्षेमध्ये गुणवंत ठरलेल्या सभासदांच्या पाल्यांना  पतसंस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात येते.